सातारा जिल्हाहोम

‘प्रहार’चे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच

तहसीलदार कल्पना ढवळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांची आंदोलनस्थळी भेट

कराड/प्रतिनिधी : –

कराडची कॅथलॅब कराडलाच व्हावी, यासाठी मंगळवारपासून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर सूरू असलेले मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांचे उपोषण गुरुवारी तिसऱ्या दिवशीही सूरुच होते. दरम्यान, तहसीलदार कल्पना ढवळे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली.

कराडला मंजूर झालेली कॅथलॅब सातारला स्थलांतरित करण्याचा घाट शासनाने घेतला आहे. याबाबत प्रहारच्या वतीने मुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्य मंत्री व प्रशासनाला निवेदने देऊनही कॅथलॅबचे स्थलांतर रोखण्याची मागणी करण्यात आली. मात्र, शासनाने अध्याप याची दखल घेतलेली नाही. याबरोबरच उपजिल्हा रुग्णालयातील अन्य प्रकार, सुरक्षा रक्षक भरती व कामगार नोंदणी तील भ्रष्टाचार थांबवावा यासाठी मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान, तहसीलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यासंदर्भात विभागाच्या प्रमुखांची तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे अश्वासन दिले आहे.

Related Articles