सातारा जिल्हाहोम

सह्याद्रि कारखान्याचा साखर निर्यात पुरस्काराने चौथ्यांदा सन्मान

देश पातळीवरील द्वितीय क्रमांक; संचालक जशराज पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला

कराड/प्रतिनिधी : –  

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याला राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन 2022-23 वर्षांत देशामध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दल देशपातळीवरील व्दितीय क्रमांकांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कारखान्याने सलग चौथ्यांदा हा बहुमान मिळवल्याबद्ध राज्याच्या सहकार क्षेत्रातून सह्याद्रि कारखाना व व्यवस्थापनाचे कौतुक होत आहे.

रविवारी नवी दिल्ली केंद्रीय ऊर्जा आणि अवजड उद्योग राज्यमंत्री श्रीकृष्णपाल गुर्जर यांच्या हस्ते, उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखानदार मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी व नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्रि कारखान्याचे सभासद, संचालक, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांनी हा पुरस्कर समारंभपूर्वक स्वीकारला.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फैक्टरीज, नवी दिल्ली या सहकारी साखर कारखान्याच्या शिखर संस्थेच्यावतीने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध बाबीत उत्कृष्ठ काम करणाऱ्या साखर कारखान्यास पारितोषिके जाहीर करून त्या कारखान्याचा गौरव करण्यात येतो.

Related Articles