सातारा जिल्हाहोम

कोयना @ 50.76 टीएमसी

कराड/प्रतिनिधी : –

सातारा जिल्ह्यातील पावसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार आहे. त्यात शनिवार पावसाचा जोर आणखी वाढला असून कोयना धरण परिसरात 100 मिलिमिटर पाऊस नोंदवला गेला आहे. सध्या धरणात प्रतिसेकंदाला 43 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरु असून धरणातील पाणीसाठ 50.76 टीएमसी झाला आहे.

शनिवारी सकाळपासून कोयनानगर, नवजा, हेळवाक, पाथरपुंज या भागांत पावसाच अजोर वाढला आहे. तसेच मोरगिरी, पाटण, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी, तारळे परिसरातही पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

कोयना धरण परिसरात शनिवारी 100 मिली पावसाची नोंद झाली आहे. तर  महाबळेश्वरला 95 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या प्रतिसेकंदाला 43 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. शनिवारी हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

Related Articles