सातारा जिल्हाहोम

कराडच्या पाणीपुरवठा योजनेला जिल्हा नियोजनच्या खर्चातून नवीन मोटर बसवा

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

कराड/प्रतिनिधी : –

जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून कराड शहराचा पाणीपुरवठा सुरु झाला. पण, रात्री अचानक याठिकाणची मोटर जळाली. मोटरीचे वायडिंगचे मोठे काम असून ती दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळीच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जुन्या जॅकवेलच्या ठिकाणी बंद पडलेली मोटर काढून नवीन मोटर बसवावी. याचा खर्च जिल्हा नियोजनमधून शासन करेल, अशा सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी खंदारे यांना तशा सूचना दिल्या आहेत.

जुन्या जॅकवेलमधून शहराला पाणी पुरवठा केला जात असतानाच अचानक मोटर जळाली. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. अशा परिस्थितीत मोटर दुरुस्तीचे काम करणे अत्यंत गरजेचे होते. अशावेळी आ. चव्हाण यांनी शहरातील परिस्थिती लक्षात घेता मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्याकडून माहिती घेतली व त्यानुसार जिल्हाधिकारी यांना फोन करून जुन्या जॅकवेलमधून तात्पुरता पाणीपुरवठा करणारी मोटर नादुरुस्त झाली असून त्यासाठी नवीन मोटर बसवावी व त्यासाठीचा खर्च शासनाने करावा, अशा सूचना आ. चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. त्याप्रमाणे पालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या असून त्यावर पालिका प्रशासनाची अंमलबजावणी सुरु आहे.

Related Articles