सातारा जिल्हाहोम

महिला मर्चटच्या वारूंजी शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

महिला मर्चट कराड संस्थेच्या वारूंजी शाखेच्या नूतन स्वमालकीच्या वास्तूचे उद्घाटन मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, मर्चट प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा प्रा. सौ. निर्मला घोरपडे व प्रा. विश्वासराव घोरपडे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी मर्चट ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, संस्थापक सौ. भारती मिणीयार, कराड मर्चटच्या चेअरमन प्रा. सौ. अरुणा चव्हाण, महिला मर्चटच्या चेअरमन सौ. कविता पवार यांच्यासह संचालक व शाखा सल्लागार सदस्य उपस्थित होते.

समारंभात आमदार अतुल भोसले यांचा सत्कार मर्चट ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांच्या हस्ते करण्यात आला. तर कराड मर्चटच्या चेअरमन प्रा. सौ. अरुणा चव्हाण यांचा सन्मान आमदार भोसले यांच्या हस्ते झाला. उपस्थित मान्यवरांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

महिला मर्चट संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सध्या ११ शाखा कार्यरत असून, त्यापैकी सात शाखा स्वमालकीच्या वास्तूंमध्ये कार्यरत झाल्या आहेत. वारूंजी शाखेचे स्थलांतर नव्या बहुमजली इमारतीत करण्यात आले असून, खातेदारांसाठी अत्याधुनिक लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती संस्थापक सौ. भारती मिणीयार यांनी दिली. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

संस्थेचा व्यवसाय ४११ कोटी रुपयांवर पोहोचला असून, एकूण ठेवी २४२ कोटी रुपयांच्या घरात गेल्याची माहिती महिला मर्चटच्या चेअरमन सौ. कविता पवार यांनी दिली. संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलचे उद्घाटन संस्थापक सौ. भारती मिणीयार व सल्लागार सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वारूंजी, गोटे, मुंढे, तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शाखेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला आकर्षक ‘फुलपाखरू सेल्फी पॉईंट’ नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला. कार्यक्रमाच्या शेवटी व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदाताई जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील, लालासाहेब जगदाळे, धनलक्ष्मी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीपभाऊ चव्हाण, कराड मर्चंटचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जगताप, संचालक माणिकराव पाटील, नथमल ओसवाल, भास्कर पाटील, अरविंद शिंदे, राहुल मिणीयार, आकाश जाधव, अरविंद कलबुर्गी, सौ. राखी चव्हाण, आनंदराव शिंदे, महिला मर्चंट चे संचालक सौ. सीमा कदम, श्रीमती रंजना कारंडे, श्रीमती संगिता क्षीरसागर, सौ. सोनिया शहा, सौ. कल्पना रैनाक, सौ. विद्या धुमाळ, अॅड. अमिता रैनाक, शाखा सल्लागार सदस्य, मुख्य व्यवस्थापक पांडुरंग यादव, सेवकवर्ग, पिग्मी एजंट, चार्टर्ड अकाउंटंट, सभासद व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles