सातारा जिल्हाहोम

महागाईविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी साताऱ्यात जनआक्रोश आंदोलन

कराड/प्रतिनिधी : – 

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि सर्वसामान्य जनतेवर पडत असलेल्या आर्थिक भाराच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार, दि. २९ मे रोजी साताऱ्यात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, सकाळी १० वाजता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, एसटी स्टँडजवळ येथे आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

सध्या वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चासह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनात सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles