सातारा जिल्हाहोम

महिला सन्मान’ विशेषांकाचे घेणाऱ्या ‘महिला सन्मान’ महाराष्ट्र दिनी प्रकाशन 

महिला मर्चंट पतसंस्थेची ५०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल

कराड/प्रतिनिधी : –

पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक असलेल्या महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था, कराड यांच्या यशस्वी प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या ‘महिला सन्मान’ या विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून उत्साहात पार पडले. हा सोहळा शुक्रवार, दि. १ मे रोजी कराड येथील श्री कृष्णामाई मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या विशेषांकाचे प्रकाशन सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य लालासाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मर्चंट ग्रुपचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, विशेषांकाचे कार्यकारी संपादक प्रा. विश्वासराव घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. अरुणा चव्हाण यांनी, स्वागत व प्रास्ताविक करत संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला. प्रा. विश्वासराव घोरपडे यांनी, संपादकीय मनोगत व्यक्त करत विशेषांकाची वैशिष्ट्ये मांडली.

यावेळी माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, तसेच तज्ज्ञ संचालक अॅड. अमिता रैनाक यांनीही संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. प्रमुख पाहुणे लालासाहेब जगदाळे यांनी, संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक करत पुढील प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांसह विशेषांकाचे डिझायनर धनंजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या ३६ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या विशेषांकात संस्थेला प्राप्त झालेले पुरस्कार, सामाजिक उपक्रम, सभासद व खातेदारांचे मनोगत, मान्यवरांचे शुभसंदेश, तसेच शाखांची माहिती आणि विविध क्षणचित्रांचा समावेश आहे, अशी माहिती संस्थापक सौ. भारती मिणीयार यांनी दिली.

संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती नोंदवली असून, एकूण ठेवी २३९ कोटी रुपये, कर्ज वितरण १७० कोटी रुपये आणि एकत्रित व्यवसाय ४०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सभासद संख्या २१ हजारांहून अधिक असून भागभांडवल १२.५० कोटी, गुंतवणूक १२९ कोटी आणि एकूण निधी ३८ कोटी रुपये इतका झाला आहे. संस्थेची वाटचाल आता ५०० कोटींच्या टप्प्याकडे वेगाने सुरू आहे.

या सोहळ्यास कराड मर्चंट व महिला मर्चंटचे संचालक, सल्लागार सदस्य, सेवकवर्ग, पिग्मी एजंट, चार्टर्ड अकाउंटंट, सभासद आणि खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांनी मानले.

Related Articles