कराडमध्येच घडणार जेईई–नीट टॉपर्स!
सुभित अकॅडमीची यशस्वी वाटचाल कायम; 2026 बॅचसाठी मर्यादित प्रवेश सुरू


कराड/प्रतिनिधी : –
जेईई (JEE) आणि नीट (NEET) सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी पुणे-मुंबईकडे धाव घेण्याची गरज आता कराडच्या विद्यार्थ्यांना उरलेली नाही. कराडमध्येच राहून जेईई-नीट टॉपर्स घडविण्याची संधी येथील सुभित आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीने उपलब्ध करून दिली असून, 2026 च्या बॅचसाठी मर्यादित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती अकॅडमीचे संचालक सुभित यादव यांनी दिली.
पुण्यानंतर कराड हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांचा कराडकडे वाढता कल लक्षात घेता, शहरातील एकमेव विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण यशाची परंपरा जपणारी सुभित अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी, कराड येथे कार्यरत असलेल्या या अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी 4 मे 2025 रोजी झालेल्या नीट (NEET-UG) परीक्षेत प्रश्नांची सर्वाधिक काठिण्य पातळी असतानाही ती लीलया पार करत घवघवीत यश मिळवून आहे. तसेच जेईई (JEE) परीक्षेतही अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारत अकॅडमीच्या सहा वर्षांच्या उज्वल यशाची परंपरा अधिक भक्कम केली आहे.
आगामी 2026 बॅचसाठी जेईईसाठी फक्त 10 ते 15 आणि नीटसाठी 20 जागा उपलब्ध असून, प्रवेश अत्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तज्ज्ञ शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन, अभ्यास साहित्य,
दैनंदिन सराव प्रश्न, नियमित टेस्ट व प्रगती मूल्यांकन अशा सर्व सोयी एकाच ठिकाणी पुरवण्यात येतात. यासोबतच MHT-CET साठीही प्रवेश प्रक्रिया सुरू असून, करियर घडविणाऱ्या या संस्थेने अल्पावधीतच मेडिकल आणि आयआयटी क्षेत्रात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे.
घरच्या शहरात दर्जेदार शिक्षण
विद्यार्थ्यांना घरापासून दूर न पाठवता, घरच्या वातावरणात स्पर्धात्मक परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून देणारी ही अकॅडमी पालकांसाठीही विश्वासाचे केंद्र बनली आहे. त्यामुळे मर्यादित प्रवेश लक्षात घेता, इच्छुक विद्यार्थी व पालकांनी वेळ न दवडता प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“जेईई आणि नीटसाठी विद्यार्थ्यांना आता पुणे किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. कराडचा विद्यार्थी कराडमध्येच राहून राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहे. सुभित अकॅडमीचा यशाचा आलेख दरवर्षी चढताच राहिला आहे. दर्जेदार शिक्षणाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा.”
– सुभित यादव
(संचालक, सुभित आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी, कराड)



