सातारा जिल्हाहोम

‘मोकाशी’मध्ये डीएमएलटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

कराड/प्रतिनिधी : – 

वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमहर्षी दादासाहेब मोकाशी कौशल्य विकास संस्थेने महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (एमएसबीएसव्हीईटी) संलग्न ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन’ (डीएमएलटी) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित या संस्थेमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच बारावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि विविध वैद्यकीय चाचण्यांचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अभ्यासक्रमासाठी केवळ ३० जागा उपलब्ध असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय व निमशासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, ब्लड बँक, जिल्हा रुग्णालये तसेच विविध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. लॅब टेक्निशियन, पॅथॉलॉजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट यांसारख्या विविध पदांवर काम करण्याचा मार्ग या अभ्यासक्रमातून खुला होतो.

वाढत्या आरोग्य सेवा क्षेत्रामुळे प्रशिक्षित लॅब टेक्निशियनची मागणी सातत्याने वाढत असून, डीएमएलटी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असा विश्वास मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी आणि संचालक विलास चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles