सातारा जिल्हाहोम

निर्भीड पत्रकारिता, समाजसेवा आणि लायन्स क्लबच्या उपक्रमांची प्रभावी मांडणी: विद्या मोरे यांचा विशेष सत्कार

कराड/प्रतिनिधी : – 

पुणे येथे पार पडलेल्या लायन्स नॅशनल मल्टी अवॉर्ड 2026 सोहळ्यात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल संपादिका व पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष विद्या मोरे यांना लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टीपल डायमंड अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे तसेच सामाजिक कार्याला प्राधान्य देत सकारात्मक पत्रकारिता करण्याचे काम विद्या मोरे यांनी सातत्याने केले आहे. विशेषतः लायन्स क्लबच्या विविध सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना प्रभावीपणे समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना लायन्स राष्ट्रीय स्तरावरील डायमंड अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विद्या मोरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निर्भीड, अभ्यासू व समाजाभिमुख पत्रकारितेचे कौतुक केले. पत्रकारिता ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून सकारात्मक कार्याला प्रसिद्धी देणारे पत्रकार समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

तसेच पुढील काळातही त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती अत्तर आंबेकर, दिलीप गुरव पाटील, अशोकराव पाटील, सागर बर्गे, अतुल शिंदे, समाजसेवक आनंदराव लादे, नगरसेवक नरेंद्र लिबे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष घराळ बापू, अशोककुमार चव्हाण, विवेक कुराडे, किरण पाटील, सुरज जाधव, संदीप काळे, अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles