सातारा जिल्हाहोम

धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटास शो द्या – सौ स्वाती पिसाळ

कराड/प्रतिनिधी : – 
“धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज” या चित्रपटाचे शो एका दक्षिणात्य चित्रपटासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तात्काळ संपूर्ण महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला शो घेण्यात यावा, अशी मागणी आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सौ. राधिका पन्हाळे, अनिल घराळ, राजेंद्र माने, अर्चना जाधव आदींची उपस्थिती होती.
सौ. पिसाळ म्हणाल्या, स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची गौरव नाथा संपूर्ण महाराष्ट्र समोर येण्याची गरज आहे. मात्र, एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी मराठी चित्रपटाला चित्रपटगृहात स्थान देण्यात आलेले नाही. हा चित्रपट चित्रपटगृहात बंद करण्याचा निर्णय डिस्ट्रीब्यूटर लॉबीने घेतला. हा तमाम मराठी माणसांवर केलेला अन्याय असून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याबाबतचे  निवेदन मुख्यमंत्री, पोलिस अधिक्षक, प्रांताधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles