श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या संचालकपदी निरंजन मोहिरे यांची निवड
काटेकोर व्यवस्थापनामुळे संस्थेची मोठी प्रगती - प्रा. चव्हाण

कराड/प्रतिनिधी –
येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निरंजन गजानन मोहिरे यांची बिनविरोध निवड झाली. सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साताराचे जनार्दन शिंदे होते. श्रीमती जयाराणी जाधव यांनी या संबधीची सुचना मांडली. व्हा. चेअरमन अनिल सोनवणे यांनी अनुमोदन दिले. कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) व अरुण जाधव यांच्या हस्ते जनार्दन शिंदे व नूतन संचालक निरंजन मोहिरे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. चव्हाण म्हणाले, मुनीर बागवान यांचे मार्गदर्शन व व्यवस्थापक विवेक वेळापुरे यांच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे संस्थेने मोठी प्रगती केली आहे. सभासद व ठेवीदारांनी गेली 36 वर्षे सलग या संस्थेवर व संचालक मंडळावर विश्वास ठेवला आहे. 146 कोटींच्या ठेवी, 277 कोटींचा एकत्रित व्यवसाय हे याच विश्वासाचे प्रतिक आहे. निरंजन मोहिरे यांच्या संस्थेतील कारभारामधील सहभाग झाल्याने संस्थेच्या प्रगतीस हातभार लागेल.
राजन वेळापुरे यांनी आपल्या भाषणात संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. बाळासाहेब मोहिरे व मुनीर बागवान यांच्या संस्थेतील योगदानाबद्दल गौरवोदगार काढून निरंजन मोहिरे यांच्यासह संस्था सर्वांच्या सहकार्याने अशीच प्रगतीपथावर राहील, असा विश्वास व्यक्त केला. विवेक वेळापुरे यांनी आभार मानले. प्रा. अशोककुमार चव्हाण शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्र यादव, डॉ. जयवंत सातपुते, सीमा विभुते, सुरेश कोळेकर श्वेता मोहिरे यांनी निरंजन मोहिरे यांचे अभिनंदन केले.