ताज्या बातम्यासातारा जिल्हाहोम

खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शनिवारी यशवंनगरला महिला मेळावा

सुनील माने यांची माहिती; मतदारसंघातील महिला, युवतींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

कराड/प्रतिनिधी –

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा महिला मेळावा यशवंतनगर, ता. कराड येथे शनिवार, दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मतदारसंघातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले.

यशवंनगर येथे महिला मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवराजदादा पाटील, शहाजीराव क्षीरसागर, कांतीलाल पाटील, मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील, बबनराव कदम, सुहास बोराटे, सी. एम. पाटील, प्रशांत यादव, प्रभावती माळी, सुरेखा डुबल, सह्याद्रि कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत हा महिला मेळावा होत असून, या मेळाव्यास मतदारसंघातून मोठ्या संख्येने महिला-युवती उपस्थित राहण्यासाठी, कार्यकर्त्यांनी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करावी. असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष देवराजदादा पाटील, प्रशांत यादव यांनी आभार मानले. या आढावा बैठकीस कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व गावचे प्रमुख पदाधिकारी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles