सर्वसामन्यांची पसंती असलेली अग्रणी बॅंक – ‘कोयना सहकारी बॅंक’

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत घडलेले व यशवंत विचारांचा वारसा व वसा जोपासत ग्राम ते राज्यस्तरावर सहकार क्षेत्रात भरीव काम करून सहकार चळवळीला दिशा देणारे स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या 86 व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी स्थापन केलेल्या कोयना सहकारी बॅंकेच्या प्रांगणात त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व बॅंकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने टाकलेला एक दृष्टीक्षेप…
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी व औद्योगिक समाज निर्माण करण्यासाठी सहकारी क्षेत्राची निर्मिती केली. या सहकारी चळवळीला चालना देत असताना स्वर्गीय विलासकाकांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेबरोबर तालुक्यातील सहकारी शिखर संस्थांच्या विकासाला चालना दिली. सर्वसामन्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे व आर्थिक पिळवणूक थांबवावी, या उदात्त हेतूने माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी सन 1996 साली कोयना सहकारी बॅंकेची स्थापन करून छोटेसे रोपटे लावले. या रोपट्याचा वआज टवृक्ष झाला असून संस्थापक चेअरमन व तालुक्यातील शिखर संस्थांचे मार्गदर्शक ॲड, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेची उत्तरोत्तर प्रगतीची घौडदौड चालू आहे. दोन दशकांहून अधिक काळ अर्थकारणात कार्यरत असणाऱ्या बॅंकेची सांपत्तिक स्थिती पाहता कोयना बँक सर्वसामन्यांच्या पसंतीला उतरली आहे.
कोयना बॅंकेच्या 11 शाखा व 1 विस्तारीत कक्ष असून भागभांडवल 6 कोटी 76 लाख आहे. निधी 15 कोटी 89 लाख आहे. ठेवी 177 कोटी 41 लाख, कर्जे 115 कोटी 11 लाख, खेळते भांडवल 207 कोटी 25 लाख, गुंतवणुक 63 कोटी 43 लाख, तर बॅंकेचा समिश्र व्यवसाय 292 कोटी 52 लाख इतका आहे. ढोबळ नफा 2 कोटी 49 लाख झाला असून निव्वळ नफा 86 लाख 78 हजार रुपये झाला आहे. ग्रौस एन. पी. ए. 6.67 टक्के, तर निव्वळ नफा 1.31 टक्के आहे. बॅंकेला स्थापनेपासून ऑडीट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. तर सी. आर. ए. आर. 15.91 टक्के आहे. बँक स्थापनेपासून सतत नफ्यात असून बँकेस ‘अ’ ऑडिट वर्ग मिळत आहे. तसेच बँकेने ग्राहकसेवा व आधुनिक बँकिंग सुविधा देण्याच्या हेतूने आय. एम. पी. एस. मोबाईल बँकिंग, यू. पी. आय. बँकिंगचा अवलंब केला आहे. तसेच ए. टी. एम. डेबिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट आर. टी. जी. एस. एन. ई. एफ. टी., ए. टी. एम., सी. टी. एस. क्लिनिंग, एस. एम. एस., तसेच मिस्ड कॉल इत्यादी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत.
अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य शेतकरी, अल्पभुधारक, ज्यांना राष्ट्रीय बॅंकाकडे पत नाही, अशा लोकांना केंद्रीत करुन बॅंकिंग क्षेत्रात आणत त्यांची अर्थिक पत निर्माण करणे, हे स्व. विलासकाका यांचे ध्येय होते. धनसंचयनातून धनसमृद्धी, बेरोजगार, गरजू तरुणांना अर्थपुरवठा करुन स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक जीवनमान उंचवावे. डोंगरी व ग्रामीण भागात अर्थकारणातील दरी दूर करण्यासाठी सहकारातील बॅंकांनी अर्थकारणांबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकारण करावे, असा त्यांचा नेहमी अट्टाहास असायचा. सहकारातील अर्थकारण अन् राजकारणचा कधीच मेळ घातला नाही. राजकीय जोडे बाहेर ठेवूनच सहकारी सहकारी संस्थांमध्ये कार्यकर्त्यांनी कार्यरत राहवे, ह्या त्यांच्या मुलमंत्राला बॅंकेच्या संचालक मंडळाने तडा जाऊन दिला नाही.
सर्वसामान्यांची पसंती असणाऱ्या व सभासदांचा दृढ विश्वास संपादन करणाऱ्या कोयना सहकारी बॅंकेच्या प्रगतीत बॅंकेचे संस्थापक चेअरमन व तालुक्यातील शिखर संस्थांचे मार्गदर्शक ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचे चेअरमन रोहित पाटील, व्हा. चेअरमन विजय मुठेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने व सर्व संचालक मंडळ, प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे. बॅंकेच्या प्रांगणात लोकनेत स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शेकाप पक्षाचे आ. भाई जगताप यांच्या हस्ते, माजी महसुल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री जयंतराव आवळे, आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, आ. संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न होत आहे.
– रोहित पाटील
(चेअरमन, कोयना सहकारी बँक लि, कराड)