‘कृष्णा’वर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते यांना अभिवादन
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कारखान्याचे व्हा. चेअरमन जे. डी. मोरे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी संचालक लिंबाजी पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, बाजीराव थोरात, बाळासो जगताप, अरविंद पाटील, सत्यजित पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर, जयवंत शुगरचे संचालक वसंतराव पवार, दिपकनाना जाधव, संजय शेवाळे आदींसह मान्यवरांनी थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मान्यवरांनी स्व. यशवंतराव मोहिते भाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



