सातारा जिल्हाहोम

सुर्लीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्याताई वेताळ यांचा उपक्रम; अंगणवाडीपासून माध्यमिक शाळेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरांचे वितरण

कराड/प्रतिनिधी : –

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुर्ली येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावणारा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य विद्याताई वेताळ यांच्या वतीने अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. नव्या दप्तरांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

शालेय साहित्याच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन शिक्षणाची गोडी वाढण्यास हातभार लागेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ‘शिक्षणासाठी मदतीचा हात आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साथ’, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक संस्थांसह विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळू शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, जिल्हा परिषद सदस्य विद्याताई वेताळ, मुख्याध्यापक राजाराम फुके, मुख्याध्यापिका विजया कदम, खाशाबा वेताळ, प्रल्हाद वेताळ, उत्तम वेताळ, शंकर पाटील, पै. विजय पाटील, चेअरमन संभाजी वेताळ, बळवंत वेताळ, संजय वेताळ, अमित फुके, हनुमंत वेताळ, रवींद्र माने, सयाजी माने यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles