सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
मुंढे सरपंच, सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय
108 Less than a minute

कराड / प्रतिनिधी : – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांना मुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. एका कार्यक्रमात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, आनंदराव घोडके, माजी उपसरपंच शिवाजीराव जमाले, सुषमा जमाले, शिवाजी जमाले, आण्णासाहेब जमाले, संभाजी जमाले, विकास लोंढे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बडेकर, पूजा जांभळे, दत्तात्रय माळी, पूनम जमाले, अमजद मुल्ला, प्रल्हाद वाघमारे, अनिकेत चव्हाण, अधिक सावंत, गणेश पवार उपस्थित होते.
दरम्यान, आ. चव्हाण यांनी नुरानी मोहला येथेही भेट दिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अफजल बागवान, अध्यक्ष आरबाज मोमीन, अदनान बागवान, शाहबाज मोकाशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
108 Less than a minute



