आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यानोकरी विषयक

सायन्स ओलंपियाड पाठोपाठ मॅथेमॅटिक्स ओलंपियाड मध्ये कोटाच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी

तनया ऋषिकेश कुलकर्णी देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथी

 

कराड / प्रतिनिधी : –

विध्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी परीक्षा
सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या माध्यमातून विज्ञान व गणित विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कराड येथील कोटा
अकॅडमीच्या विध्यार्थीनी तनया ऋषिकेश कुलकर्णी हिने घवघवीत यश संपादन करत
देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथी आल्याने
सायन्स ओलंपियाड पाठोपाठ मॅथेमॅटिक्स ओलंपियाड मध्ये कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी घेतली
सायन्स ओलंपियाड फाउंडेशन ही संस्था सायन्स व गणित विषयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून गेली २५ वर्षे कार्य करत आहे .यासाठी ही संस्था इयत्ता आठवी नववी व दहावी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर सायन्स व मॅथेमॅटिक्स या विषयांची ओलंपियाड स्पर्धा आयोजित करते नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या परीक्षेत कराड येथील कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅथेमॅटिक्स ओलंपियाड मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. सायन्स ओलंपियाड नंतर नुकताच मॅथेमॅटिक्स ओलंपियाड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या इयत्ता नववी मधील तनया ऋषिकेश कुलकर्णी या विद्यार्थिनीने ६० पैकी ५९ मार्क्स मिळवून देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता दहावी मधील वेदांतिका काकडे व विनय कारंडे या विद्यार्थ्यांनी ६० पैकी ५८ मार्क्स मिळवून देशात सातवा व आंतरराष्ट्रीय स्तरावर आठवा क्रमांक पटकावला त्याचबरोबर इयत्ता आठवी मधील आदित्य रामेश्वर पाटील ,ओम थोरात व प्राजक्ता तोरणे यांनी ६० पैकी ५६ मार्क्स मिळवून देशांमध्ये २६ वा व आंतरराष्ट्रीय स्तरावर ३६ वा क्रमांक पटकावला . तसेच इयत्ता आठवी मधील सोळा विद्यार्थ्यांनी, इयत्ता नववी मधील चौदा विद्यार्थ्यांनी व इयत्ता दहावी मधील नऊ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवून गोल्ड मेडल मिळविले आहे व ते विद्यार्थी दुसऱ्या राउंड साठी पात्र झाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कोटा अकॅडमीचे संचालक डॉ . महेश खुस्पे व संचालिका मंजिरी खुस्पे यांच्या हस्ते करण्यात आला . कोटा अकॅडमीचे संचालक डॉ . महेश खुस्पे सर यांनी विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले. व विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये १००० बक्षीस स्वरूपात देण्याचे घोषित केले. याप्रसंगी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्य जयश्री पवार उपप्राचार्य . सना संदे तसेच विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स ओलंपियाड करिता मार्गदर्शन करणाऱ्या शितल रामुगडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

Related Articles