आयुष्यमान स्पेशलमनोरंजन

सुर्ली येथील रामायण कथा सोहळ्याला उदंड प्रतिसाद

कराड / प्रतिनिधी  : –

22 जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुर्ली येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन केले आहे. या संगीतमय रामायण कथा सोहळ्याला आबाल वृद्ध आणि महिलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. दि. 16 ते 18 अशा तीन दिवस संगीतमय रामायण कथा सादर करण्यात येणार आहे. ह. भ.प. गुरुवर्य सोनाली दीदी करपे श्री क्षेत्र सद्गुरु कल्याण स्वामी संस्था चकलंबा यांनी ही कथा सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
मा. रामकृष्ण वेताळ साहेब युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने सुर्ली ता.कराड येथे भव्य संगीतमय रामायण कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी प्रसिद्धी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण कराड उत्तर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात प्रभू रामचंद्र यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने या रामायण कथा ऐकण्यासाठी उपस्थिती लावत आहेत. सायं. पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत सोनाली दीदी करपे यांच्या अमृतमयी आवाजात ही रामायण कथा ऐकण्यासाठी गर्दी उसळत आहे.याच ठिकाणी प्रसादाचेही आयोजन केले असल्यामुळे सलग तीन दिवस गर्दीचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे.
या संगीतमय रामायण कथा सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले आहे. व्यासपीठ, बैठक व्यवस्था आणि प्रसादाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे ठेवलेली असल्याने ही रामायण कथा ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. सुर्लीसह परिसरातून श्रोत्यांची रोज सायंकाळी हजेरी लावत आहेत. या भक्तीमय वातावरणाचा आनंद घेत आहेत. मा. रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने बैठकीचे चोख नियोजन केलेले आहे.

रामायण कथा घराघरात पोहोचावी हाच उद्देश. आयोध्या मध्ये प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अशा वेळी रामायण कथा घराघरात आणि सर्व नागरिकांना ऐकायला मिळावी या उदात्त हेतूने या कथेचे आयोजन केले आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनातून आदर्श घेऊन प्रत्येकाने आपले जीवन सुखकर करावे हाच कथा आयोजनाचा हेतू आहे.

Related Articles