कृष्णा कारखान्यावर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारखान्याचे व्हा.चेअरमन जे. डी. मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संचालक बाजीराव निकम, बाजीराव थोरात, धोंडिराम जाधव, बाळासो जगताप, अविनाश खरात, छबन कांबळे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, एम. के. कापूरकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी कारखाना संरक्षण विभागातर्फे शानदार ध्वजसंचलन करण्यात आले.
दरम्यान जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयात य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.



