सातारा जिल्हाहोम

‘कृष्णा’ आणि ‘रयत’ परिवाराचे सलोख्याचे नाते – डॉ. सुरेश भोसले

कोयना दूध संघाच्या कार्यकर्ता मेळावा; रयत संघटनेचा सहकार पॅनलला पाठिंबा - ॲड. उदयसिंह पाटील 

कराड/प्रतिनिधी : –

स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि स्व. विलासराव पाटील (काका) यांच्या माध्यमातून पूर्वीपासून ‘कृष्णा’ आणि ‘रयत’ परिवाराचे सलोख्याचे नाते राहिले आहे. स्व. विलासकाकांनी आणि आप्पांनी दीर्घकाळ समाजकारण व राजकारणामध्ये एकत्रित काम केलेले आहे. तसेच सभासद शेतकऱ्यांचा विश्वास आणि साथ हेच आमचे खरे बळ आहे. शेतकरीहित आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवूनच आमची सहकारातील पुढील वाटचाल सुरू राहील, असा विश्वास जयवंतराव भोसले सहकार पॅनल प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.

रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील रयत संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी कोयना दूध संघाच्या कार्यस्थळावर उत्साहात संपन्न झाला. यावेळी रयत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने सहकार पॅनलला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखान्याच्या गेल्या ११ वर्षातील देदीप्यमान प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी, आज तुमच्या आमच्या जीवनाचा, रोजी रोटीचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण कार्यकर्त्यांची भूमिका आपल्या संघटना, संस्था एकमेकांना पूरक कसा ठरतील, प्रयत्न करायचा आहे, विनंती त्यांनी कार्यकर्ते सभासदांनी केली. तसेच रयत संघटनेच्या कार्यकर्ता सहकार पॅनेलला सहकार्य करेल, असा शब्द त्यांनी यावेळी डॉ. सुरेश भोसले यांना कार्यकर्त्यांच्या वतीने दिला.

कार्यक्रमास रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles