सातारा जिल्हाहोम
‘सह्याद्रि’च्या गळीत हंगामाची आज सांगता
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या 52 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक संभाजी साळवे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. जयश्री साळवे या उभयतांच्या हस्ते शनिवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी दिली.
कारखान्याच्या सन 2025-26 या 52 व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभास व श्री सत्यनारायण महापूजेस कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक शिंदे यांनी केले आहे.



