सातारा जिल्हाहोम

कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार – पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : –

मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्थ आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत श्री. अतुल भोसले विजयी झाले आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो. ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करतील. त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे, त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ते राज्याच्या विकासाकरिता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील ही अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा

ज्या प्रमाणे 2019 मध्ये भाजप नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली. त्या प्रकारचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles