सातारा जिल्हाहोम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी विंगमध्ये सभा 

महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजन 

कराड / प्रतिनिधी : – देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी (ता. ८) कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या भव्य पटांगणावर ना. अमित शाह यांची तोफ धडाडणार आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या पटांगणावर शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

याप्रसंगी जिल्ह्यातील विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती असणार आहे. या सभेला कार्यकर्ते, नागरिक, मतदार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील यांनी केले आहे.

Related Articles