सातारा जिल्हाहोम

कराड रोटरी क्लबकडून किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

कराड/प्रतिनिधी : –

रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय आणि कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी ऑडिटोरियम यामध्ये सेव्ह गर्ल सेफ गर्ल, नवदुर्गा नारीशक्ती अभियान अंतर्गत किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

सांगली येथील अमोल ढोबळे व त्यांच्या टीमने प्रात्यक्षिकद्वारे उपस्थित विद्यार्थी मुलींना स्वसरंक्षण कसे करावयाचे हे सोप्या पद्धतीने सांगितले व त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करुन घेतले. प्रशिक्षण व दाखवत असलेल्या प्रात्यक्षिकाला विद्यार्थी मुलींच्या कडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीच्या सौ.मोनाली उपरे यांनी स्वागत केले.
रो.किरण जाधव यांनी सुत्रसंचालन केले. रो.डॉ.अस्मिता फासे यांनी प्रास्ताविक केले. दीदी फौंडेशन व रिस्की फायटर मार्शल आर्ट अ‍ॅकॅडमी सांगली चे अमोल ढोबळे यांची ओळख रो.डॉ.भाग्यश्री पाटील यांनी करुन दिली.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डीन डॉ.नामदेव जाधव यांनी मनोगत केले.
रो.डॉ.रुपाली देसाई यांनी ‘उंच माझा झोका’ ही प्रतिज्ञा उपस्थित विद्यार्थीनींकडून म्हणवून घेतली. रो.सौ.शुभांगी पाटील यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी 400 विद्यार्थी मुली उपस्थित होत्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो.रामचंद्र लाखोळे, सचिव रो.आनंदा थोरात, रो.गजानन कुसुरकर, रो.डॉ.रूपाली देसाई, रो.पल्लवी यादव, सौ.अनुराधा टकले, रो.प्रताप मोरे उपस्थित होते.

सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथे रोटरी क्लब ऑफ कराड व कराड प्रसूति आणि स्त्री रोग सोसायटी च्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा नारी शक्ती अभियानातर्गंत किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. अमोल ढोबळे व त्यांची टीमने प्रात्यक्षिक द्वारे उपस्थित विद्यार्थी मुलींना स्वसरंक्षण कसे करावयाचे हे सोप्या पद्धतीने सांगितले व त्यांच्या कडून प्रात्यक्षिके करुन घेतले. प्रशिक्षण व दाखवत असलेल्या प्रात्यक्षिकाला विद्यार्थी मुलींच्या कडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. रो.डॉ.भाग्यश्री पाटील व डॉ.प्रीती देशपांडे यांनी मुलींना स्वसंरक्षणाबरोबरच आरोग्याची निगा कशी राखावी याचे सखोल मार्गदर्शन केले.

प्रा.इ.क.पाटील यांनी स्वागत केले. रो.किरण जाधव यांनी सुत्रसंचालन केले. रो.डॉ.अस्मिता फासे यांनी प्रास्ताविक केले. रो.पल्लवी यादव यांनी ओळख करुन दिली. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सौ.माधुरी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. रो.रामचंद्र लाखोले यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी 370 विद्यार्थी मुली उपस्थित होत्या. याप्रसंगी रो.डॉ.राहुल फासे, रो.डॉ.शेखर कोगणूळकर, रो.आनंदा थोरात, हर्षला देशमुख उपस्थित होते.

Related Articles