सातारा जिल्हाहोम

स्वच्छ सर्व्हेक्षणात कराड बसस्थानक द्वितीय – शर्मिष्ठा पोळ

पुणे विभागामध्ये ब’ गटात समावेश; अडीच लाख रुपयांचे बक्षिस, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान

कराड/प्रतिनिधी : –

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानामध्ये कराड बसस्थानकाने पुणे विभागात ब’ गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. अडीच लाख रुपयांचे बक्षिस, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या स्पर्ध्येसाठी कराड आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असून शहरातील अनेक संस्था, संघटना, व्यापारी व नागरिकांच्या सहकार्यातूनही लोकोपयोगी उपक्रम राबवण्याल्यामुळेच हे यश मिळाले असल्याची माहिती कराड आगार प्रमुख शर्मिष्ठा पोळ यांनी दिली.

सदर स्पर्धेत कराड बसस्थानकाला मिळालेल्या बक्षिसाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी, आगार व्यवस्थापक विक्रम हांडे, सहाय्यक वाहतूक अधिक्षक सागर पांढरपट्टे, समिन शेखखान व अधिकारी उपस्थित होते.

आगार प्रमुख पोळ म्हणाल्या, राज्य परिवहन महामंडळ प्रशासनातर्फे 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबवण्यात आले. यामध्ये एकूण चार सर्व्हेक्षण करण्यात आली. पहिल्या सर्व्हेक्षणात सन 2020 मध्ये 500 पेक्षा कमी फेऱ्या असल्याने कराड बसस्थानाकाचा समावेश ‘ब’ गटात समावेश होऊन आगाराला व्दितीय क्रमांक मिळाला. तर 2023-24 मध्ये 700 हून अधिक फेऱ्या असल्याने कराड आगाराचा ‘अ’ गटात समावेश होऊन सलग दुसऱ्या व तिसऱ्या सर्व्हेक्षणात बसस्थानाकाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. मात्र, पुन्हा अंतिम सर्व्हेक्षणात कराड बसस्थानाकाचा ‘ब’ गटात सामावेश झाल्याने व्दितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles