कृष्णा कारखान्यावर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी :-
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्था नांदगावचे संस्थापक अध्यक्ष वि. तु. सुकरे (गुरुजी) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन जगदीश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संचालक बाजीराव निकम, अविनाश खरात, वसंतराव शिंदे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. यावेळी कारखाना संरक्षण विभागातर्फे शानदार ध्वजसंचलन करण्यात आले.
दरम्यान, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूरचे माजी सभापती आनंदराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याठिकाणी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.