सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यावर कर्मचार्‍यांना तिळगुळ वाटप

कराड/प्रतिनिधी : –

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मकर संक्रातीनिमित्त कारखाना, कराड तालुका साखर कामगार संघ व गणेश शिवोत्सव मंडळ यांच्यावतीने कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रातीनिमित्त कारखान्याच्यावतीने संचालक मंडळ, कारखाना व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील नातेसंबध दृढ होण्यासाठी तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, कराड तालुका साखर संघाचे अध्यक्ष एम.के.कापूरकर, वसंतराव पवार, शंकरराव थोरात यांच्यासह सर्व खातेप्रमुख यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले, तसेच मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles