कृष्णा कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी
कराड/प्रतिनिधी : –
य. मो. कृष्णा सहकारी कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र येडेमच्छिंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगार व माता-बालक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये १५८ जणांची आरोग्य तपासणी व त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. काम करत असताना आपल्या शरीराची काळजी घेऊन काम केले पाहिजे. कारखान्याचे चेअरमन डॉ सुरेश भोसले नेहमीच ऊसतोड मजुरांसाठी अनेक उपक्रम राबवित असतात.
शिबीराची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती. शिबीरास प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश वाठारकर, डॉ.गायत्री जगताप, डॉ. ईश्वर दाभाडे, कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.हर्षल निकम यांच्यासह आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, औषध निर्माण अधिकारी,आरोग्यसेवक, आरोग्यसेविका,आशा गट प्रवर्तक, आशा स्वयंसेवीका यांचे सहकार्य लाभले.



