सातारा जिल्हाहोम

रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा होणार 

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांचा शनिवारी (दि. १०) जानेवारी रोजी हा वाढदिवस विविध धार्मिक, सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांनी साजरा होणार आहे.

सकाळी त्यांनी कुलदैवत श्री.ज्योतिबा यांचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर येथे प्रस्थान करणार आहेत. त्यानंतर कराड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.

यानंतर ते श्री क्षेत्र पाल येथे खंडोबा देवाचे दर्शन घेणार आहेत. सकाळी नऊ वा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पुढे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन ते आपल्या मूळ गावी सुर्ली येथे रवाना होणार आहेत.

त्यानंतर दिवसभर आनंदराज फार्म हाऊस, खंबाळे पाटील, सुरली येथे रामकृष्ण वेताळ वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. धार्मिक श्रद्धा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या भरगच्च कार्यक्रमांमुळे रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार आहे.

Related Articles