सातारा जिल्हाहोम

जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात साई सेवा क्रीडा मंडळ, छत्रपती संभाजीनगर संघाला पराभूत करत रत्नागिरी संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. छत्रपती संभाजीनगर संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आकर्षक चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी संचालक जितेंद्र पाटील, शिवाजी पाटील, जे.डी. मोरे, अविनाश खरात, धोंडीराम जाधव, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पवार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम.के. कापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेत शिवमुद्रा क्रीडा मंडळ, कौलव संघाने तृतीय क्रमांक, तर प्रकाश तात्या बालवडकर क्रीडा मंडळ, पुणे संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. वैयक्तिक कामगिरीत साई सेवा क्रीडा मंडळ संघाचा राहुल टेके अष्टपैलू खेळाडू ठरला. शिवमुद्रा संघाचा साहिल पाटील उत्कृष्ट चढाईसाठी, तर वाघजाई संघाचा साईराज कुंभार उत्कृष्ट पकडीसाठी गौरविण्यात आला. स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून रुपेश जाधव, साहाय्यक पंच म्हणून रमेश देशमुख, तर निरीक्षक म्हणून शशिकांत यादव यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रा. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, प्रा. अमोल मंडले, राहुल निकम, आबासो यादव, प्रा. महेश कुंभार आदींनी केले.

यावेळी हेमंत धर्मे, राजेंद्र दुर्गावळे, विक्रम साळुंखे, वसंतराव पवार, कृष्णत कापूरकर, धनंजय मोहिते, सदाशिव कदम, सुरेश साळुंखे, प्रदीप साळुंखे, व्यंकटराव जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रो-कबड्डी स्टार खेळाडूंची उपस्थिती

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने प्रो-कबड्डी लीगमधील नामांकित खेळाडूंनी उपस्थित राहून स्पर्धेला विशेष रंगत आणली. दबंग दिल्ली संघाकडून खेळणारे अजिंक्य पवार, सुशांत साईल तसेच पाटणा पायरेट्स संघाकडून खेळणारे शुभम शिंदे व साहिल पाटील यांचा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles