सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यात स्व.डॉ. पतंगराव कदम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सहकार, शिक्षण व ग्रामीण विकासाला चालना मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, संचालक बाबासो शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, माजी संचालक ब्रिजराज मोहिते, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्व.डॉ. पतंगराव कदम यांनी आयुष्यभर समाजहितासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles