कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नितीन ढापरे बिनविरोध

कराड/प्रतिनिधी : –
कराड शेती उत्पन्न बाजार समितीची उपसभापती निवड बुधवारी झाली. या निवडीत नितीन भीमराव ढापरे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये अॅड. उदयसिह पाटील-उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, अविनाश मोहीते, रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनलच्या विजयी उमेदवारामधून उपसभापती पदासाठी नितीन ढापरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक प्रकाश आकाराम पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, विनोद (सोमनाथ) जाधव, उध्दवराव फाळके, मानसिंगराव जगदाळे, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, गणपत पाटील, तसेच प्रभारी सचिव ए.आर. पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक अपर्णा यादव, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विलास मोरे यांनी काम पाहिले.
निवडीनंतर नितीन ढापरे व सभापती शंकर इंगवले, तसेच संचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, स्व. यशवंतराव चव्हाण, स्वा.सै.स्व. दादा उंडाळकर, स्व. शामराव अण्णा पाटील, लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
निवडीनंतर बोलताना नितीन ढापरे म्हणाले, स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सहकारी संस्थांना आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या आदर्शावर आम्ही वाटचाल करत आहोत. अॅड. उदयसिंह पाटील यांचे कुशल मार्गदर्शन आणि सभापती, संचालक मंडळाच्या सहकार्याने बाजार समितीच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम करून शेतकर्यांप्रती कृतज्ञ राहू.


