मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

कराड/प्रतिनिधी : –
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरलेल्या कराड उत्तर मतदारसंघातील पाल जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी सुरेश पाटील, मदन काळभोर, शंकर शेजवळ, प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण सर्वांनी एकदिलाने करायचे आहे. इंदोली-पाल उपसा सिंचन योजना मार्गी लागल्याने या भागातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. कराड उत्तरमध्ये महायुतीचा उमेदवार नक्कीच विजयी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रवेशामुळे कराड उत्तर मतदारसंघात भाजपला नवचैतन्य लाभले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत झाले आहे.
या प्रवेश सोहळ्यात पाल गावचे सतीश शिंदे नरेंद्र साळुंखे, चोरेचे माजी सरपंच जनार्दन साळुंखे, प्रवीण साळुंखे, प्रशांत जाधव, संतोष कुलकर्णी, राजेंद्र साळुंखे, सचिन वाघमारे, दीपक साळुंखे, संदीप कवळे, संजय पाटील, हरपळवाडीचे माजी सरपंच तानाजी पाटील, मच्छिंद्र संकपाळ, युवराज पाटील, शंकरराव चंदुगडे, सुभाष गोरे, जयसिंग चंदुगडे, सुरेश चंदुगडे, संजय कदम, कृष्णत कणसे, रघुनाथ ढगाले, लक्ष्मण कदम, महादेव काटे, शंकर चंदुगडे, जगन्नाथ चव्हाण, जगन्नाथ कदम, मरळीचे माजी सरपंच संपतराव पाटील, धावरवाडीचे उपसरपंच नानासो शेळके, राहुल कदम, विजय डगाले, संभाजी शेळके, शिवाजी चंदुगडे, चोरेचे माजी सरपंच संजय साळुंखे आदी मान्यवरांचा सहभाग होता.
यावेळी सुनील काळभोर, संतोष पाटील, गणेश इंजेकर, महेश चंदुगडे, शिवराज पाटील, शरद भोसले, अगन साळुंखे, जितेंद्र साळुंखे, मुकुंद गोळे, अशोक यादव, हनुमंत माने, शुभम भिलारे, शंकर मसुगडे, मोहनराव सावंत, आकाश तळेकर, सागर कोळभोर, श्रीकांत चव्हाण, दिलीप काळभोर, दत्तात्रय शेलार, रतन काळभोर, ओंकार पवार, कृष्णत चंदुगडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


