सातारा जिल्हाहोम

म्हाडाचा उपअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात 

शेतकऱ्याला मागितली साथ हजाराची लाच, चार हजार घेताना सापडला 

कराड/प्रतिनिधी : –
म्हाडाचा उपअभियंता (उपविभाग सातारा) येथील वरिष्ठ लिपिक ना हरकत दाखला देण्यासाठी लाच घेताना लासुलीचे प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. संबंधित वरिष्ठ लिपिकाने तक्रारदार शेतकऱ्याला 7 हजारांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती 4 हजारांची लाच घेताना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरची कारवाई केली.
मनोजकुमार दशरथ माने (म्हाडा वरिष्ठ लिपीक, उपअभियंता, उपविभाग सातारा) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हा शेतकरी असून पत्नीच्या नावे सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील म्हाडा वसाहतीमध्ये असणारा जमीन प्लॉट विकणे कामासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लोकसेवक मनोज माने याने 22 जुलै रोजी तक्रारदार यांच्याकडे 7 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती 4 हजार रूपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक (पुणे)  शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (सातारा), पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, पोलीस हवालदार गणेश ताटे, पोलीस नाईक निलेश चव्हाण यांनी सापळा रचून केली.

Related Articles