सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांनी केला सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड संचलित बॅरि. पी. जी. पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या 10 विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
बॅरि. पी. जी. पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी अभिरूप मुलाखत सत्र घेण्यात आले होते. या अभिरूप मुलाखतीस 14 उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी प्रल्हाद पवार, करण चिंचणकर, अमित मोरे, मनोज गुप्ता, तानाजी वाघमोडे, सुरज होवाळ, रोहित गुजर, हिना मुल्ला, स्वरांजली नलवडे, तेजस्विनी माणगावे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्धल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. नेताजी सूर्यवंशी, उपप्राचार्या प्रा. एम.बी. कांबळे, डॉ.ए.जे. सकटे, स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक प्रा. योगेश कस्तुरे, समन्वयक प्रा. सुभाष शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.