आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रहोम

रामकृष्ण वेताळ यांच्या पुढाकारातून वीट भट्टी व्यवसायिकांना दिलासा; संघटनेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

 

कराड / प्रतिनिधी : –

 

वीट भट्टी व्यवसायिकांच्या विविध समस्या यशस्वीपणे मार्गी लावणार , भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ . कराड उत्तरचे नेते, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, वीट भट्टी व्यवसायिकांच्या विविध समस्या यशस्वीपणे मार्गी लागल्या! तळबीड गणाचे पंचायत समितीचे युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य शिवडे गावचे दिनेश घाडगे बापू यांनी वीट भट्टी व्यवसायिकांचे प्रश्न निराकरण करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत.या वेळी वीट भट्टी चालक मालक संघटना यांच्या वतीने  रामकृष्ण वेताळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी वीट भट्टी संघटनेचे अध्यक्ष  विजय जाधव, अर्जुन राठोड, जयवंत जाधव नाना, प्रविण नलवडे, रामदास माने,राजीव रावळ, संदिप घाडगे नाना, मंडल अध्यक्ष योगीराज सरकाळे, मुकुंद गोळे आणि अन्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

 

Related Articles