सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये उत्तरालक्ष्मी महोत्सवास प्रचंड प्रतिसाद 

कराड/प्रतिनिधी : – 

कराड शहरातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक रणजीत पाटील यांच्या माध्यमातून व जिजाऊ शहर स्तर संघ यांच्या विशेष सहकार्याने येथील कृष्णा घाटावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय उत्तरालक्ष्मी महोत्सवास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून मोठी उलाढाल झाली.

या महोत्सवात बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होती. सुमारे 150 बचत गटांनी आपल्या वस्तू मांडल्या होत्या. त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. रणजीत पाटील नाना व महिलांच्या हस्ते उद्घाटन झाले. बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. सलग दोन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनात हजारो महिला व नागरिकांनी भेट देऊन खरेदी केली.

पहिल्या दिवशी सायंकाळी शाहीर डॉ. देवानंद माळी यांचा श्री उत्तरालक्ष्मीचा जागर हा कार्यक्रम झाला. मराठी संस्कृतीची जपणूक करणार्या या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. जागर, गोंधळ गीतांसह कराडचे आद्य ग्रामदैवत श्री उत्तरालक्ष्मीची ऐतिहासिक माहितीही नागरिकांना मिळाली.

दुसऱ्या सायंकाळी जागर स्त्री शक्तीचा खेळ पैठणीचा हा महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास हजारो महिलांची उपस्थिती होती. होम मिनिस्टर फेम तेजस्विनी शहा यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महिलांनी उत्स्फूर्तपणे मनोरंजन आणि स्पर्धात्मक खेळांमध्ये भाग घेतला. रणजीत पाटील नाना मित्र परिवाराने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles