सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्यातून इथेनॉलचा पहिला टँकर रवाना

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा कारखाना नेहमीच साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्विकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतो. कारखान्यात या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन संचालक जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करून, टँकर ऑईल कंपनीकडे रवाना करण्यात आला.

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या दूरदृष्टीतून कारखाना कार्यस्थळावर शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून साखरेसह पूरक उद्योगांची जोड देऊन, सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर लक्षात घेऊन, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे.

इथेनॉल टँकरचे पूजनप्रसंगी संचालक धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, माजी संचालक ब्रिजराज मोहिते, येरवळेचे माजी सरपंच हंबीरराव यादव, विलास यादव, कृष्णा कृषी संघाचे उपाध्यक्ष संदीप यादव, एम.के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, जनरल मॅनेजर डिस्टीलरी विकास आभाळे आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles