आयुष्यमान स्पेशलमनोरंजन

28 एप्रिल पासून शिवपुत्र संभाजी महानाट्य

 

कराड / प्रतिनिधी:-

कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून जगदंब क्रिएशन निर्मित महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह २५० हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून साकारलेले व शिवपुत्र संभाजी महाराजाच्या पराक्रम आणि ख्याती सांगणारे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कराड येथील कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे दि. २८ एप्रिल ते ३ मे २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे. अशी माहिती दिग्दर्शित महेंद्र महाडिक व अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (शुक्रवारी) बोलत होते. यावेळी वासू पाटील उपस्थित होते.ते म्हणाले,या दिमाखदार महानाट्यसाठी अंदाजे रोज सातारा जिल्हा कराड परिसरातील नाट्य रसिक व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. कराडमध्ये कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे या महानाट्याचे भव्य नियोजन केले आहे. महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा गौरवशाली इतिहास २५० हून अधिक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण २ तास ३० मिनिटे करणार आहेत. महानाट्यमध्ये चित्त थरारक घोडे स्वारी, शानदार फटाक्याची आतिषबाजी, नवीन तीन मजली भव्य रंगमंच, चित्त थरारक युदध प्रात्याक्षिके याचे थेट सादरीकरण केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी पहिले २ दिवस २० टक्के विशेष सवलत देण्यात आलेली आहे.

तरी सर्वांनी संभाजी महाराजाचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य पहावे. असे आवाहन यावेळी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व महेंद्र महाडिक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *