ताज्या बातम्यासातारा जिल्हा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन

कराड/प्रतिनिधी:-
कराड शहर भाजपा च्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव  विक्रम पावसकर,प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस  सुदर्शन पाटसकर, शहराध्यक्ष  एकनाथ बागडी, नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर,  नितीश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बाबासाहेबांच्या बुधवार पेठ येथील पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी सरचिटणीस  प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष  प्रशांत कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष ऍड विशाल कुलकर्णी, उपाध्यक्ष  शैलेंद्र गोंदकर,कामगार आघाडी अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष रुपेश मुळे, ओबीसी आघाडी अध्यक्ष सुनील नाकोड, प्रदेश व्यापारी आघाडी उपाध्यक्ष धनंजय खोत, मुकुंद चरेगावकर, उमेश शिंदे,धनश्री रोकडे, कराड शहर महिला मोर्चा अध्यक्ष सीमा घार्गे, मंजिरी कुलकर्णी, प्रदेश महिला आघाडी सदस्या स्वाती पिसाळ, सुरेश काळे, सागर लादे, विवेक भोसले, संतोष काळे, रुपेंद्र कदम, सुहास चक्के, उल्लास बेंद्रे, अनिल पवार,ओंकार ढेरे, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *