आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्या

महीब्या व बकासुर या बैलजोडीने रुस्तम ए हिंदकेसरी चा मानाचा किताब

विशेष प्रतिनिधी:-

भाळवणी तालुका खानापूर येथे देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये रेठरे( तालुका कराड) येथील सदाभाऊ कदम ( मास्तर )यांच्या महीब्या व बकासुर या बैलजोडीने रुस्तम ए हिंदकेसरी चा मानाचा किताब पटकावून त्यांना पहिल्या क्रमांकाचे १९ लाख रुपये किमतीच्या महिंद्रा कंपनीच्या थार गाडीचे बक्षीस मिळाले

 या शर्यतीचे आयोजन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते 

 कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावचे सदाशिव कदम हे पेशाने शिक्षक असून ते सध्या जिल्हा परिषद खुबी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत . तसेच त्यांना अध्यात्माची आवड असून ते व त्यांची पत्नी दरवर्षी पायी आषाढी वारी करतात

कदम यांना बैल पाळण्याचा व क्रीडा क्षेत्राचा मोठा छंद आहे त्यांच्याकडे सहा बैल आहेत ते बैलांची जिवापाड काळजी घेतात तसेच बैलगाडी शर्यतीची त्यांना मोठी आवड आहे गेल्या दोन वर्षापासून ते स्वतःची बैल घेऊन शर्यतीत सहभाग घेतात . काले येथील त्यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील (ड्रायव्हर) आबा हे महिब्या या बैलास सांभाळ व शिकवण करतात तसेच महीब्या या बैलाने अनेक मैदानं गाजवली आहेत त्यांना आजपर्यंत पाच मोटरसायकल व रोख बक्षीसांची कमाई करून दिली आहे

 भाळवणी येथे झालेल्या मैदानात सदाशिव कदम यांचा महिब्या व मुळशी पुणे येथील मोहित धुमाळ यांचा बकासुर ने उपांत्य फेरीत मजल मारल्यानंतर अंतिम फेरीत येत या बैल जोडीने अंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *