उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा, रामकृष्ण वेताळ आणि पदाधिकाऱ्यांनी राबवले विविध उपक्रम

कराड/प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आश्रम शाळेतील मुलांना फळे वाटप, मतिमंद मुलांना स्नेहभोजन, रक्तदान शिबिर, गरजूंना साहित्य वाटप असे विविध उपक्रम यावेळी राबवले. हे सर्व उपक्रम कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील,कराड तालुका अध्यक्ष महेश कुमार जाधव, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सरचिटणीस शंकरराव शेजवळ,बाजार समिती संचालक राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यभर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात आले.आश्रम शाळा नागझरी ता.कोरेगाव येथील शंभर विद्यार्थ्यांना फळ वाटप, एहसास मतिमंद मुलांची शाळा वळसे ता. सातारा येथील विद्यार्थ्यांच्या बरोबर स्नेहभोजन, जागृती माध्यमिक आश्रम शाळा उंब्रज ता. कराड येथील विद्यार्थ्यांना फळ वाटप आणि साहित्य वाटप, मसूर ता.कराड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, गरजूंना साहित्याचे वाटप असे विविध उपक्रम रामकृष्ण वेताळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवून वाढदिवस खरोखरीचा सेवा दिन म्हणून साजरा केला.
मसूर तालुका कराड येथे महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 227 जणांनी रक्तदान केले. या रक्तदानातून जमा झालेले रक्त रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते ब्लड बँकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. अशा प्रकारे लोकहिताचे विविध उपक्रम राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या सेवादिनांमध्ये चेअरमन जयवंत जगदाळे, नवीन जगदाळे, सूर्यकांत पडवळ, सरचिटणीस शहाजी मोहिते,दिपाली खोत, सुरज पाटोळे, अभि काशीद, अनिकेत गांभीरे, संदीप पवार, बाळासो पोळ, बाळासो पवार ,सुरेश पाटील,भरत पिसाळ,रणजीत थोरात,संदीप बाबर रवींद्र लाहोटी संजय घारगे गणेश घोरपडे यासह कराड उत्तर मधील पदाधिकारी आणि बुथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे सेवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवू.
कराड उत्तर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे लोक कल्याणकारी उपक्रम मतदार संघात राबवून एक आदर्श निर्माण करू. रामकृष्ण वेताळ.
कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख
फोटो नेम आश्रम शाळा नागझरी ता. कोरेगाव येथे रामकृष्ण वेताळ आणि सहकाऱ्यांनी फळ वाटप केले.