कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीय परीक्षेत यश

कराड/प्रतिनिधी : –
देशातील नामांकित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER) मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NIPER JEE – २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत, महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटविला आहे.
या परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई नलवडे हिने अखिल भारतीय स्तरावर १०९१ वा क्रमांक, सानिका पवार हिने ११४१ वा क्रमांक, साक्षी नलवडे हिने १३८९ वा क्रमांक, तर अनुजा कुंभार हिने २३५२ वा क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाच्या यशात भर घातली आहे. या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन तसेच महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा मोठा वाटा आहे. या यशामुळे कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी हे गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. सी. यादव, विभागप्रमुख डॉ. शुभांगी पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



