सातारा जिल्हाहोम

कराड उत्तरचा किंगमेकर : मा. रामकृष्ण वेताळ

संघर्ष, निष्ठा आणि परिवर्तनाचा प्रवास – मा. रामकृष्ण वेताळ.

“वादळे आली, वारे बदलले

पण ज्याने दिशाच सोडली नाही,

तोच नेता काळाच्या कसोटीवर

खरा उतरतो…”

कराड उत्तरच्या राजकारणाने अनेक स्थित्यंतरं पाहिली. सत्तेची गणितं बदलली, पक्षांची समीकरणं उलथापालथ झाली, अनेक चेहरे आले आणि गेले. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक नाव सातत्याने ठामपणे उभं राहिलं— मा.रामकृष्ण श्रीमंत वेताळ,संघर्ष, जिद्द, निष्ठा आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी कराड उत्तरच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण केली.

विरोधी वर्चस्वाच्या काळात घेतलेला धाडसी निर्णय…

एक काळ असा होता की कराड उत्तरमध्ये काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीचं राजकीय वर्चस्व सर्व स्तरांवर प्रस्थापित होतं. आमदार, खासदार, जिल्हा परिषद,पंचायत समिती सर्वच ठिकाणी सत्तेची सूत्रं विरोधकांच्या हाती होती. त्या काळात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद मर्यादित होती. अशा परिस्थितीत भाजपमध्ये काम करणे म्हणजे राजकीयदृष्ट्या कठीण,आव्हानात्मक आणि धाडसाची वाट निवडण्यासारखं होतं.

मात्र मा.रामकृष्ण वेताळ यांनी सोयीचा मार्ग स्वीकारला नाही. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी भाजप पक्षाची निवड केली. सत्ता नसताना पक्षासाठी झटणे,कार्यकर्ते घडवणे आणि जनतेपर्यंत विचार पोहोचवणे—हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहिले.

पक्ष वाढवण्याची कला आणि कार्यपद्धती…..

मा.रामकृष्ण वेताळ यांच्यात पक्ष बांधणीची एक वेगळीच हातोटी दिसून येते. जिद्द, मेहनत, चिकाटी, नियोजनबद्ध काम, व्यापक लोकसंपर्क आणि सामान्य माणसाला आपलंसं करण्याची क्षमता—या सर्व गुणांचा त्यांनी अचूक वापर केला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कराड उत्तरमध्ये भाजपची पाळेमुळे हळूहळू खोलवर रुजू लागली.

ते केवळ शहरकेंद्रित राजकारणात अडकले नाहीत.वाडी-वस्तीवर,गावागावात जाऊन त्यांनी पक्षकार्य केलं. सामान्य माणसाच्या अडचणी ऐकून घेणं, त्यांना धीर देणं आणि पक्षाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं—हीच त्यांची कार्यशैली राहिली.

परिवर्तनाचा पाया घालणारा संघर्ष……

आज कराड उत्तरमध्ये जे परिवर्तन दिसून येतं,मागील पंचवार्षिक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपचा वाढलेला प्रभाव दिसतो, त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष दडलेला आहे.पंचायत समितीतील शिरकाव आणि जिल्हा परिषदेत मिळालेलं यश हे अचानक घडलेलं नाही.या यशाचा मजबूत पाया घालण्यासाठी मा.रामकृष्ण वेताळ यांनी सातत्याने कष्ट वेचले आहेत.

एकेकाळी भाजपकडे कोणतंही सत्तास्थान नव्हतं.त्या काळात ते एक खंदे शिलेदार म्हणून पक्ष बांधणीसाठी झटत होते. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे,त्यांना एकत्र ठेवणे आणि संघटन मजबूत करणे हेच त्यांचे मुख्य कार्य होते.

आज सत्ता,पण संघर्षाची जाणीव कायम……

आज चित्र पूर्णपणे बदलले आहे.केंद्रापासून तालुक्यापर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर भाजपचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. मात्र सत्ता मिळाल्यानंतरही रामकृष्ण वेताळ यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नाही.

त्यांच्या मते,सत्ता हे अंतिम ध्येय नसून सेवा आणि संघटन हेच खरे उद्दिष्ट आहे.म्हणूनच सत्ता असो वा नसो,जनतेशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटलेली नाही.

पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्याना दिलेला न्याय….

पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या—

१.भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस

२.लोकसभा समन्वयक

३.बाजार समिती संचालक

४.सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष

५.सदस्य ,प्रदेश संचालन समिती,भाजपा महाराष्ट्र

६.कृषी क्षेत्र समन्वयक,राज्य समिती,भाजपा महाराष्ट्र

७.विशेष निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्र

या प्रत्येक पदाला त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन,सक्रिय सहभाग आणि परिणामकारक कामातून पूर्ण न्याय दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत,निवडणूक समन्वय असो किंवा संघटनात्मक बांधणी—प्रत्येक ठिकाणी त्यांची कार्यशैली प्रभावी ठरली.

युवकांचे नेतृत्व आणि प्रेरणास्थान…..

आज मा.रामकृष्ण वेताळ हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.संघर्षातून पुढे गेलेला नेता,कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा मार्गदर्शक आणि सातत्याने प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.युवकांना संघटित करणे,त्यांना जबाबदाऱ्या देणे आणि नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणे—हे त्यांनी नेहमीच प्राधान्याने केले.

वरिष्ठ नेतृत्वाशी समन्वय…

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले,ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे,भाजप जिल्हाध्यक्ष आणि आ.डॉ.अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मा.रामकृष्ण वेताळ कार्यरत आहेत.वरिष्ठ नेतृत्वाशी समन्वय ठेवत स्थानिक पातळीवर प्रभावी काम कसं करता येतं, याचं ते उत्तम उदाहरण आहेत.

कराड उत्तरचा ‘किंगमेकर’

अनेक निवडणुकांमध्ये योग्य उमेदवार निवडून त्यांना विजय मिळवून देण्यात रामकृष्ण वेताळ यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. स्वतः पुढे येण्यापेक्षा संघटन मजबूत करून यशस्वी नेतृत्व घडवण्याची भूमिका त्यांनी वारंवार बजावली. त्यामुळेच कराड उत्तरमध्ये त्यांची ओळख ‘किंगमेकर’ म्हणून निर्माण झाली आहे.

“नेता होणं मोठं नाही,

नेतृत्व घडवणं हीच खरी ताकद.”

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेख म्हणजे केवळ शुभेच्छा नसून त्यांच्या दीर्घ संघर्षाला,निष्ठेला आणि अथक कार्याला दिलेला मानाचा मुजरा आहे.कराड उत्तरच्या राजकारणात त्यांनी घडवलेला बदल हा अनेक कार्यकर्ते आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शब्दांकन : श्री.संदीप कोरडे.

Related Articles