सातारा जिल्हाहोम

कराडला शेतकऱ्यांच्या ‘दौलती’चा उत्सव 

प्रदर्शनात सामील झाली पश्चिम महाराष्ट्रातील जातिवंत जनावरे 

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या रविवारीच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या अस्सल ‘दौलती’चा जणू उत्सवच भरला होता. गाय, म्हैस, बैल प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातून आलेली जातिवंत जनावरे सहभागी झाली होती. या प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्या जनावरांच्या मालक असलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत चॅम्पियन ऑफ द शोचा किताब खातगुण येथील दत्तात्रय प्रभाकर जाधव यांच्या खिलार बैलाने पटकावला.

सकाळच्या सत्रात उपसभापती नितीन ढापरे यांच्या हस्ते व सभापती सतीश इंगवले, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्यासह अन्य पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनामध्ये सातारा, सांगली, पुणे पुणे जिल्ह्यातून पशुपालक शेतकरी त्यांची जातिवंत जनावरे घेऊन सहभागी झाले होते. जनावरांचे संगोपन, चारापाणी, त्यांचे व्यवस्थापन, औषधोपचार, आणि त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न या सर्व बाबी शेतकऱ्यांना संबंधित पशुपालक मालक शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेता आल्या.

आदत खोंड, खिलार खोंड दोन दाती, संकरित गाय, म्हैस, रेडा अशा वेगवेगळ्या विभागामध्ये विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २०००, १५००, आणि १००० रुपये रोख व प्रमाणपत्र, शील्ड असे बक्षीस देण्यात आले.

सायंकाळी युवा नेते आदिराज पाटील यांच्यासह बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे यांच्या हस्ते व कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, संचालक शिवाजी शिंदे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सहाय्यक आयुक्त श्नी. भोसले यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

स्पर्धेतील गटनिहाय पहिले तीन क्रमांक अनुक्रमे विजेते व उर्वरित उत्तेजनार्थ पारितोषिके याप्रमाणे; खिलार खोंड आदत – निखिल सचिन भोकरे (कुंभोज), ओमकार अंकुश गरुड (येणके), छगन अशोक गलांडे (स्वरूपनरवाडी), स्वराज हेमंत मदने (बिळाशी), चंद्रकांत बाळकृष्ण जंगम (शेरे). खिलार खोंड दोन दाती – धनाजी तानाजी फडतरे (वाघजाई नगर), पांडुरंग शंकर पवार (शेरे), आराध्या प्रशांत देशमुख (निसराळे)‌. खिलार खोंड चार दाती – युवराज शंकर महाडिक (टेंभू ), नारायण पांडुरंग मदने (खरातवाडी ), मारुती हौसेराव पाटील (शिराळा). खिलार बैल जुळीक. दत्तात्रय प्रभाकर जाधव (खातगुण), रोहित प्रकाश जुजारे (म्हैशाळ), राजेंद्र विठ्ठल पवार (शेरे), विजय किसन चव्हाण (कवठे), विक्रम रघुनाथ पाटील (ईश्वरपूर), दत्तात्रय प्रभाकर जाधव (खातगुण)- चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.

खिलार कालवड – विष्णू कृष्णात चव्हाण (नेर), प्रज्वल संजय वडकर (रेठरे बुद्रुक), अतुल गुलाब लावंड (खातगुण), रोहन भगवान थोरात (मलकापूर), रितेश राजेंद्र पाटील (केसे), निशांत काकासाहेब माणगावे (खंडेराजुरी), ऋतुराज बाबासाहेब जाधव (भटवाडी). खिलार गाय – विशाल सुभाष कोळी (कार्वे), माऊली ज्योतीराम रूपनवर (अमरापूर), सुनील शंकरराव थोरात (कळंत्रेवाडी). देशी गोवंश – अजित चंद्रकांत कोळी (कडेगाव), सर्जेराव शामराव मोहिते (बेलवडे बुद्रुक), सुनील लक्ष्मण जाधव (सैदापूर), अजित शिवाजी मोहिते (तळबीड), नानासो कृष्णा पवार (गोंदी), रविराज शिवाजी यादव (येरवळे). होस्टन गाय – अक्षय आनंदा गावडे (ईश्वरपूर), अशोक शुभम करे (पेठ), वैष्णवी अधिकराव पाटील (नांदगाव), तुकाराम मोहन भोसले (देवराष्ट्रे). जर्सी गाय – भारत सदाशिव जंगम (बच्चे सावर्डे). संकरित कालवड – वैष्णवी अधिकराव पाटील (नांदगाव), हणमंत वसंत जाधव (रेठरे बुद्रुक), बंडुपंत जयसिंग यादव (बच्चे सावर्डे).

मुऱ्हा / म्हैसाना म्हैस – सददाय हाजीसाब शेख (कराड). सुधारित जातीची रेडी – प्रशांत बाळकृष्ण देशमुख (निराळे), ज्ञानदेव एकनाथ शेडगे (अंगापूर), सुरज अजित मुंडे (काले), चेतन ज्ञानदेव शेडगे (अंगापूर), अरबाज मगदूम शेख (कराड). जातिवंत रेडा – संजय अर्जुन जाधव (येलूर), निलेश विलास पाटील (सोंडोली).

Related Articles