‘सह्याद्रि’कडून नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवडयातील ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

कराड/प्रतिनिधी : –
ऊस गाळप, साखर उत्पादन आणि आर्थिक व्यवस्थापनात अग्रेसर असलेल्या सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हगामामध्ये नोव्हेंबर, २०२५ मधील दिनांक 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दुसर्या पधरवड्यातील कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास प्रति में टन रूपये ३५००/- प्रमाणे एकूण रूपये 37 कोटी 61 लाख 45 हजार ऊस बिलाची रक्कम शेतक-याच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत विजयसिंह शिदे यांनी दिली.
‘सह्याद्रि’चे चेअरमन राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटीत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सरू असून, कारखान्याने यापूर्वीच नोव्हेंबर 2025 मधील पहिल्या पंधरवड्यात आलेल्या ऊसापोटी प्रति मे टन रूपये ३५००/- प्रमाणे एकूण रूपये २६ कोटी ४० लाख ऊस उत्पादक शेतक-याच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा केले होते. आता दुसर्या पंधरवड्याच्या ऊस बिलाची रक्कम रूपये 37 कोटी 61 लाख 45 हजार ऊस उत्पादक शेतक-याच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा केल्याने शेतकरी वर्गातून आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
‘सह्याद्रि’ने नेहमीची रास्त भाव देण्याची परंपरा याही गळीत हंगामात जोपासलेली आहे. ऊसाच्या बिलाची रक्कम वेळेत जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतास पाठवून जास्तीत जास्त ऊस गळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.



