कराडमध्ये यशवंत व लोकशाही आघाडीची सत्ता
भाजपचा पराभव; नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह यादव मोठ्या मताधिक्यांनी विजयी

कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिका निवडणुकीत यशवंत व लोकशाही विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपचा पराभव झाला आहे. नगराध्यक्षपदी यशवंत व लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार व शिंदेसेनेचे नेते राजेंद्रसिंह आत्माराम यादव यांनी तब्बल ९ हजार ७३५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला.
रविवारी येथील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या उपस्थितीत शांततेत आणि कडक बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांना १४ हजार ३६१ मते मिळाली, तर राजेंद्रसिंह यादव यांना २४ हजार ९६ मते मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण यांना २ हजार ३०९ मते मिळाली. अपक्ष उमेदवारांमध्ये रणजित पाटील यांना ६ हजार ६५१, गणेश कापसे ४५३, इम्रान मुल्ला २५८, अॅड. श्रीकांत घोडके १२८, शरद देव १७४, तर बापू लांडगे यांना १२६ मते मिळाली.
या निकालानंतर कराड नगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, नगरसेवकपदासाठी लोकशाही विकास आघाडीचे १३, यशवंत विकास आघाडीचे ६, भाजपचे ११ आणि अपक्ष १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रभागनिहाय निकालानुसार प्रभाग १ अ मधून रुपाली माने (लोकशाही आघाडी) १,८३८ मते मिळवून विजयी झाल्या, तर १ ब मधून माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील (लोकशाही आघाडी) १,८०८ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग २ अ मधून नीलम कदम (लोकशाही आघाडी) १,५११, तर २ ब मधून सुहास पवार (लोकशाही आघाडी) १,४५९ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ३ अ मधून रजिया आंबेकरी (लोकशाही आघाडी) १,४८६, तर ३ ब मधून प्रवीण पवार (लोकशाही आघाडी) १,४३६ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ४ अ मधून प्रियांका यादव (यशवंत विकास आघाडी) ७७१, तर ४ ब मधून अर्चना ढेकळे (यशवंत विकास आघाडी) १,००३ मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग ५ अ मधून अरुणा पाटील (लोकशाही आघाडी) १,९७१, तर ५ ब मधून राहुल भोसले (लोकशाही आघाडी) २,७१७ मते मिळवून विजयी झाले.
प्रभाग ६ अ मधून शारदा माने (भाजप) १,८८६, तर ६ ब मधून अल्ताफ शिकलगार (यशवंत विकास आघाडी) २,०१७ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ७ अ मधून अपक्ष उमेदवार तेजश्री पाटसकर १,५८५ मते मिळवून विजयी झाल्या, तर ७ ब मधून अजय पावसकर (भाजप) १,३४२ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ८ अ मधून किशोरी शिंदे (भाजप) २,०४९, तर ८ ब मधून विजय वाटेगावकर (भाजप) २,१६१ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ९ अ मधून मिनाज पटवेकर (लोकशाही आघाडी) ३,००४, तर ९ ब मधून प्रताप साळुंखे (लोकशाही आघाडी) २,६३१ मते मिळवून विजयी झाले.
प्रभाग १० अ मधून आशा मुळे (यशवंत विकास आघाडी) २,०८२, तर १० ब मधून सुमित जाधव (भाजप) १,१६० मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ११ अ मधून वैष्णवी वायदंडे (भाजप) १,१४०, तर ११ ब मधून गणेश पवार (भाजप) १,६४३ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग १२ अ मधून अनिता पवार (यशवंत विकास आघाडी) १,७२८, तर १२ ब मधून विजय यादव (यशवंत विकास आघाडी) १,६०५ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग १३ अ मधून किर्तीका विभूते (यशवंत विकास आघाडी) १,४४०, तर १३ ब मधून आशुतोष डुबल (भाजप) ७१६ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग १४ अ मधून वर्षा वास्के (भाजप) १,७०२, तर १४ ब मधून शिवाजी पवार (भाजप) १,८७१ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग १५ अ मधून योगिता जगताप (लोकशाही आघाडी) २,४९२, १५ ब मधून अख्तरहुसेन आंबेकरी (लोकशाही आघाडी) ३,११४, तर १५ क मधून सुप्रिया खराडे (लोकशाही आघाडी) २,३६३ मते मिळवून विजयी झाल्या.



