सातारा जिल्हाहोम

शिवाजी विद्यापीठ अधिसभेपूर्वी सिनेट सदस्यांची पूर्ण वेळ कुलगुरू नेमण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने

कराड/प्रतिनिधी : – 

शिवाजी विद्यापीठाची आज शनिवार दि. 20 डिसेंबर रोजी अधिसभा आयोजित केली होती, त्यापूर्वी सिनेट सदस्य अमित जाधव , ॲड.अभिषेक मिठारी,ॲड.अजित पाटील, ॲड.अभिजित कापसे, विष्णू खाडे यांनी जोरदार घोषणाबाजी करुन निदर्शने केली.

गेले अनेक महिने शिवाजी विद्यापीठाला पूर्ण वेळ कुलगुरू मिळालेला नाही. ही शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना आहे. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळत आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही प्रशासन राजकारण करण्यात व्यस्त आहे. दोन अधिसभांमधील अंतर आठ महिन्यांपेक्षा असू नये अशी तरतूद असताना तब्बल साडेनऊ महिन्यानंतर अधिसभा आहे. ही अधिसभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गेल्या दोन महिन्याच्या प्रभारी काळामध्ये विद्यापीठात घाशीराम कोतवाल नाट्य चालू आहे. मनमानी कारभार समन्वयाचा अभाव आणि इतर आरोप प्रशासनावर होत आहेत. हे गंभीर आहे. मोठ्या अधिकार पदाचा वापर स्वार्थासाठी चालू आहे आता त्याचा विनोद झाला आहे. छुप्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे. हे विद्यापीठ स्वाभिमानी लोकांनी प्रचंड मेहनतीतून कष्टातून अनेकांनी आपल्या जमिनी देऊन खूप मोठा संघर्ष करून मिळवलेला आहे. या विद्यापीठाला दैदिप्यमान इतिहास आहे आणि या इतिहासालाच आज नख लावण्याचा प्रयत्न प्रशासन आणि त्यातील प्रमुख अधिकारी करत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत. विद्यापीठाचा कारभार हा विद्यार्थी केंद्रितच असला पाहिजे शैक्षणिक गुणवत्ता राखलीच पाहिजे आणि विद्यापीठांमध्ये राजकीय अड्डे बंद झाले पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे.

– अमित जाधव (सिनेट सदस्य, शिवाजी  विद्यापीठ कोल्हापूर) 

Related Articles