कृष्णा कारखान्यावर ऊसतोडणी कामगार व माता-बालक आरोग्य शिबिर संपन्न
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोडणी कामगार व माता-बालक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये १८० जणांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे.डी. मोरे, विलास भंडारे, मॅनेंजींग डायरेक्टर बाजीराव सुतार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जगदीश जगताप म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना नेहमीच ऊसतोड मजुरांच्या प्रकृतीची काळजी घेत आला आहे. कारखान्याच्या वतीने त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाते. शिबीराची सुरवात धंन्वतरी व स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.
शिबीरामध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कृष्णा कारखान्यामार्फत ऊस तोड महिला मजुरांना मोफत सॅनिटरी नॅपकिनचेही वाटप यावेळी करण्यात आले. कृष्णा हॉस्पीटलचे वैद्यकिय अधिकारी, रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्राच्या डॉ. स्मिता देसाई, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल निकम, जनसंपर्क अधिकारी सागर पवार यांच्यासह वैद्यकीय स्टाफ यांचे या शिबीरास सहकार्य लाभले.



